वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – शुक्रवारी दि. १८ डिसेंबरला दुपारी ४ वाजता वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीतर्फे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा 11 डिसेंबर 2020 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शिक्षणाधिकारी ( माध्य.) व जिल्हाधिकारी वर्धा यांचेमार्फत शासनास निवेदन देण्यात आले.



यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे सतीश जगताप, मनोहर बारस्कर, प्रदीप गोमासे, रामेश्वर लांडे, मिलिंद मुळे, अनिल तडस, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे रवीबाबूजी शेंडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष पांडुरंगजी भालशंकर, कार्यवाह महेंद्र सालंकार, शशांक हुलके, शशिकांत वैद्य, सुनील धवने, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय कार्यवाह अजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रविण भोयर, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कार्यवाह सुरेश रोठे, महिला आघाडी प्रमुख मनीषा साळवे, शुभांगी चिकटे, प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे अरुणकुमार हर्षबोधी, प्रकाश कांबळे, मुकुंद नाखले, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद खोडे, शिक्षकेत्तर संघटनेचे मंगेश शहाकार, मनोज बाचले, मेहरकिरण गुजर, श्री बदूकले, श्री पारिसे तसेच मोठ्या संख्येने शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते




