धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – परंडा तालुक्यातील आसू महसूल मंडळ कार्यालयात दि १८ डिसेंबर रोजी फेरफार अदालत घेण्यात आली या वेळी १३ शेतकऱ्यांचे फेरफार मंजुर करून फेर ओढून देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे कामे विना विलंब व्हावे या साठी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे दि १८ डिसेंबर रोजी आसू मंडळाच्या २२ गावा साठी फेरफार अदालत घेण्यात आली या वेळी अनेक फेरफार , खरेदी विक्री वरील प्रकरणे यांच्या सह ईतर प्रकरणाचा निपटारा करण्यात आला
मंडळ आधिकारी पाटील आर.जी .यांच्या मार्गदर्शना खाली तलाठी चुकेवाड , व्ही एम , सातपुते एम एन , वाळके तुकाराम , गुडमिरे प्रशांत , भोसले उल्हास यांनी फेरफार अदालत यशस्वी करण्या साठी परिश्रम घेतले , या फेरफार अदालती मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले .







