कोल्हापूर (नियाज जमादर) – येथील बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (रजि) यांच्यावतीने
कोल्हापूरमधील लक्ष्मी पुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कोरोना योध्दा पोलिस प्रशासन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जीव धोक्यात घालून, लोकांची सेवा करणारे खरे समाजकार्य पोलिस प्रशासनाने केले आहे. आज पोलीस हे रक्षक देवता ठरले असून, लोकांनी घरीच राहून शक्य असेल त्यांच्याहीपेक्षा जास्त कोरोना या संसर्गजन्य रोगास रोखण्यासाठी परिश्रम घ्यावेत. पोलीसांच्या सेवेला, जनजागृतीला कोरोना योध्दा सन्मान देवून आज गौरविण्यात आले.
पोलिसांच्या कोरोना योध्दा सन्मान जाहीर सत्कार प्रसंगी बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (रजि.)च्या जिल्हाध्यक्षा आसिम शिराज नुराणी, प.म.अध्यश्रक्ष भगवान दाभाडे, प.म. उपाध्यक्ष दादा जगदाप, कार्याध्यक्षा शीला दिपकर, कोल्हापूर जिल्हा युवाध्यक्ष दिपक भोसले, कोल्हापूर युवा उपाध्यक्ष अब्दुल मुहम्मद शेख, शहराध्यक्ष विजय गायकवाड, करवीर तालुकाध्यक्ष अनिता कांबळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रमीजा शेख, करवीर तालुका उपाध्यक्षा प्रभा भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.







