चोपड्यात सात गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

chopada-pistol

चोपडा (प्रतिनिधी संदिप ओली) – पंजाब राज्यातील दोन तरुण मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे कट्टे खरेदी करून एसटी बसने शहरात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने चुंचाळे (ता.चोपडा)बस स्थानकावर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून बलवाडीहून चोपडयाकडे येणार्‍या बस मधून संशयित दोन पंजाबी तरुणांना सात गावठी बनावटीच्या कट्ट्यासह रंगेहाथ पकडून अटक केल्याची धडक कारवाई शनिवारी सकाळी 7 वाजता करण्यात आली. तर दोघा आरोपींकडून सात गावठी कट्टे,मॅगेझीन व मोबाईल सह दोन लाख अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गेल्या दोन महिन्यातील चवथी तर नाशिक विभागातील आज पर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.संबंधितां कडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून,पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.तर या घटनेने चोपडा शहरासह ग्रामीण भागात प्रचंड खडबळ उडाली आहे.पंजाब राज्यातील दोन तरुण मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे सात कट्टे खरेदी करून एसटी बसने शहरात येत असल्याची गुप्त माहिती शहरपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाल्याने जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे,चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,चोपडा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखालीशहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकअजित सावळे,पो.हे.कॉ.सुनील पाटील,पो.हे.कॉ.जितेंद्र सोनवणे,पो.ना.संतोष पारधी,पो.ना.विलेश सोनवणे,पो.ना.ज्ञानेश्वर जवागे,पो.ना.शेषराव तोरे पो.ना.जयदीप राजपूत,पो.ना.वेलचंद पवार,पो.ना.प्रदीप राजपूत,पो.कॉ.मिलिंद सपकाळे,पो.कॉ. प्रकाश मथुरे,पो.कॉ.नितीन कापडणे,पो.कॉ.योगेश शिंदे,पो.कॉ.सुभाष सपकाळ,पो.कॉ.रवींद्र पाटील,पो.कॉ.प्रमोद पवार यांच्या पथकानेचुंचाळे (ता.चोपडा) येथे बसस्टँडवर सापळा लावून थांबले .

बलवाडी ते चोपडा एसटी बस क्रमांक एमएच 40 एन 9064 मधून हिरव्या रंगाचे जॅकेट व लाल काळया रंगाचे पॅन्ट तसेच दुसर्‍याने काळपट निळ्या रंगाचे जॅकेट व भुरसट रंगाचे जॅकेट असे कपडे परिधान केलेले अंदाजे 30 ते 35 वयोगटातील दोन तरूण संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना एसटी बस मधून खाली उतरून त्यांची चौकशी केली .दीपक विजय वर्मा (वय-36) रा.हाँगवल खुर्द ता.जिल्हा लुधियाना (पंजाब) ,बलजीतसिंग सारबन सिंग सरदार (वय-28) रा.बस्ती बाजीगड होशियारपूर (पंजाब)असे सांगितले.यावेळी दोघांची पंचा समक्ष झाडाझडती घेतली .

2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सात गावठी बनावटीचे कट्ट्या सह रिकामी मॅगेझीन किट,17,000/- रुपये किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल व 1530/- रुपये रोख असा एकूण दोन लाख 28 हजार 530/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गावठी बनावटीच्या सात कट्ट्यासह मॅगेझीन विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्या प्रकरणी पो.ना.विलेश विश्वासराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग-6 गुरनं.42/2020 प्रमाणे दीपक विजय वर्मा (वय-36) रा.हाँगवल खुर्द ता.जिल्हा लुधियाना (पंजाब),बलजीतसिंग सारबन सिंग सरदार (वय-28) रा.बस्ती बाजीगड होशियारपूर (पंजाब) यांच्या विरुद्घ भारतीय हत्यार कायदा कलम-3/ 25,5 (1) (अ) 7/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here