सातारा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे तसेच शिक्षकप्रिय शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची पदोन्नतीने शिक्षण उपसंचालकपदी अल्पसंख्यांक व प्रौढ़ शिक्षण संचालनालय पुणे येथे सन्मानाने बढती झाली आहे. राजेश क्षीरसागर यांचा सातारा जिल्हा कलाध्यापक संघ,साताराचे जिल्हा अध्यक्ष उमेश देशमुख यांचे हस्ते पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किशोर कुदळे,उपाध्यक्ष सागर सुतार, बाळासाहेब कचरे, श्री.खाडे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी श्री.क्षीरसागर याच्या कार्यकाळात त्यांनी कलाशिक्षक बंधू भगिनींना त्यांच्या हक्काच्या कला कार्यानुभव विषयाच्या तासिका मिळवून देणे असो,शासकीय रेखकला परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध करून देणे असेल,ए.टी.डी. टू ए.एम.स्केल साठी शाळांनी प्रस्ताव पाठविण्याचे पत्र तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कलाशिक्षक बांधवांच्या ए.टी.डी. टू ए.एम.स्केल साठी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.नागपुरे यांचेशी अनेक वेळा प्रत्यक्षात फोन करून ए.टी.डी. टू ए.एम.स्केल साठी प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले. असे एक ना अनेक प्रश्न श्री.क्षीरसागर यांच्या माध्यमातून सुटल्याचे सांगितले.जिल्ह्यातील सर्व कलाशिक्षक बांधवांचे वतीने त्यांचे आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
या छोटेखानी सत्कार समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देताना राजेश क्षीरसागर यांनी सातारा जिल्हा कलाध्यापक संघाच्या कामाचे कौतुक केले. सातारा येथे संपन्न झालेला राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी कलाध्यापक संघाने मोलाची साथ दिली हे सांगायला ही ते विसरले नाहीत.आजपर्यंत जिल्हा कलाध्यापक संघाने जिल्हा कला उत्सव,विभागीय कला उत्सव,राज्यस्तरीय कला उत्सव,अगदी राष्ट्रीय पातळीवर कला उत्सव मधे जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे काम केले.शासकीय ग्रंथ महोत्सव,मतदार जागृती अभियान, विज्ञान प्रदर्शन,जिल्हा परिषदे मार्फत राबविलेल्या चित्रकला स्पर्धा,अगदी काल परवा पार पडलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या जिल्हा पातळीवर झालेल्या स्पर्धा असोत,सर्व पातळीवर सातारा जिल्हा कलाध्यापक संघ,नेहमीच शिक्षण विभागाच्या मदतीला धावून येतो याची प्रचिती आल्याचे सांगितले त्यांनी आवर्जून सांगितले. शेवटी जिल्हा कलाध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किशोर कुदळे यांनी आभार मानले.







