सातारा (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर जगदीश शिंदे) | पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदाताई देशमुख यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या नेत्रदीपक विजयानिमित्त पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला, तसेच पदवीधर मतदारांचे आभार मानले.
हा ऐतिहासिक विजय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि राजकुमार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली साध्य झाला असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी आवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षदाताई देशमुख यांच्या विजयामुळे पदवीधरांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे, शिक्षकांचे आणि तरुणांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडले जातील, असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष सनी आवळे यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) या दणदणीत विजयामुळे सातारा जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.







