धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील तालुका वाचनालय कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रमुख माजी नगराध्यक्ष प्रा. पी एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष अक्षय महाजन,परीट समाजाचे तालुकाध्यक्ष अशोक जाधव,दिव्यांग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील,परीट समाजाचे विनोद रोकडे,रवींद्र जाधव,गणेश जाधव,नगरसेवक नंदू पाटील,भागवत चौधरी,योगेश पी पाटील, रघुनंदन वाघ,प्रकाश पाटील, रवी काबरे,वासुदेव वाघ आदी उपस्थित होते.







