जळगाव जिल्ह्यात आज नवीन १६९ कोरोना बाधित रुग्ण

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज प्राप्त झालेल्या कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणी अहवालात १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
या १६९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधीक ७३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण १६; भुसावळ १३; चोपडा १३ आणि जामनेर-१० असे रूग्ण आढळून आले आहेत. अन्य ठिकाणांचा विचार केला असता, अमळनेर-९; पाचोरा-४; भडगाव-४; धरणगाव-६; यावल-७; एरंडोल-१; रावेर-८; चाळीसगाव-४; बोदवड-१ अशी रूग्णसंख्या अशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५४७१ झाली आहे. यातील ३२२३ रुग्ण बरे झाले असून, १४०९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवरील मृतांची संख्या ३१५ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here