जेल मधून फरार असलेले मोटारसायकल चोरणारे व घरफोडया करणारे दोन चोरटे खुलताबाद पोलीसांच्या जाळ्यात

khultabad-police

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – गेल्या एका वर्षापासून जळगाव जिल्ह्य़ातील कारागृहात मधून फरार असलेला व मोटारसायकल चोरणारे घरफोड्या करणारे दोन चोरटे खुलताबाद पोलीसांनी रंगेहात पकडले असून चोरटयाकडून चोरलेल्या चार मोटारसायकलीसह घरफोडी करून चोरलेली पाच एलईडी टीव्ही शेगडी , व साडया ,असा एकुण असा २,००,८५० / – रुपयांचा मुद्देमाल

 

चोरटयाकडून पोलीसांनी जप्त केला आहे दोन्ही चोरट्याना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या चोरटयाकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता खुलताबाद पोलिसांनी वर्तविली आहे.

 

खुलताबाद पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी दिलेल्या माहिती अशी की, दि.२० सप्टेंबर २०२० रोजी बाजारसावंगी येथील आजीनाथ हारीभाऊ काटकर यांची होंडा शाईन गाडी तर दि.१४ ऑक्टोंबर २०२० रोजी बाजार सावंगी येथूनच सुरेश राजाराम परमार यांची होंडा ड्रीमयुगा या चोरट्यांनी लंपास केली होती तर त्याच दिवशी रामेश्वर तेजराव भागवत रा.शिरोडी यांचे बाजारसावंगी येथील इलेक्ट्रीक दुकानाचे शटर उचकटुन या चोरटयाने एलईडी टिव्ही , फॅन , शेगडी चोरुन नेले होते. तर दि.२७ ऑक्टोंबर २०२० रोजी धामणगाव चे पोलीस पाटील पंडीत माचवे व जावेद शेख यांची होंडा शाईन दुचाकी चोरली होती, तर आजीनाथ खंडागळे यांचे कपडयाचे दुकानाचा पत्रा उचकटुन साडया , होजीअरी मटेरीअल चोरी केली होती अशा प्रकारे आठ चोरीच्या तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या, मागील काही दिवसापासुन सतत एकाच परिसरात अशाप्रकारचे गुन्हे घडत असल्याने पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी स्वत : गुन्ह्यांना आळा बसविण्याचे उद्देशाने चोरट्यांना पकडण्याची योजना आखली . त्याबाबत आराखडा तयार करुन पोलीस ठाणे हद्दीतीत पोलीस पाटील गणेश राऊत, पंडित माचवे यांच्यासह , पोलीस मित्र , ग्राम संरक्षण दलाचे सदस्य यांच्या मदतीने संशयीत इसमांची माहीती घेऊन तपासाची चक्र फिरवली होती.

 

दिनांक १ ९ / १२ / २०२० रोजी पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की तालूक्यातील झरी येथे दोन संशयीत इसम मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेले असुन गिराहाईक शोधत आहेत , पो.नि सिताराम मेहेत्रे यांनी स्वत : पथक तयार करुन मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रवाना होवुन सापळा लावला , झरी – वडगाव रोडवर शेषराव ऊर्फ शश्या ऊर्फ सचिन वय २८ वर्ष रा.बिलवडी ता.जामनेर जि.जळगाव ह.मु झरी ता.खुलताबाद व प्रविण ऊर्फ पिन्टु पिता दुर्योधन सोनवणे वय २ ९ वर्ष रा.पिंप्री धरणगाव ता.धरणगाव जि.जळगाव . यांना चोरीच्या मोटारसायकल सह पकडले व विचारपुस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसह ठिकठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली.

सदर गुन्हयातील आरोपी शेषराव ऊर्फ शश्या ह.मु झरी ता.खुलताबाद जि.औरंगाबाद हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी जालना , जळगाव , औरंगाबाद ग्रामीण , नाशिक जिल्हयामध्ये चोरी , घरेफोडीचे गुन्हे दाखल आहे . आरोपी शेषराव सोनवणे हा यापुर्वी कारागृह ( सबजेल ) जळगाव मध्ये असतांना पळुन गेला होता तो सध्या जेलमधून फरार असल्याचे बोलले जात आहे सध्या त्याचे मोटार सायकल चोरी व शटर फोडीचे एकुण आठ गुन्हे उघडकिस आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे.
चोरट्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील , सहाय्यक पोलीस अधिक्षक गोरख भामरे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे , पो उपनिरीक्षक भगवान झरेकर , पोउपनि जगदीश मोरे , पो.हे. संजय जगताप , नवनाथ कोल्हे , पो.ना.विनोद बिघोत , योगेश नाडे , यतीन कुलकर्णी , पो.कॉ. प्रकाश ठोकळ , किशोर महेर , योगेश तरमाळे , जीवन घोलप संतोष पुंड व पोलीस पाटील गणेश राऊत यांनी केली विशेष परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here