पोलीस उपाधीक्षक यांच्या वतीने खुलताबाद तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा सत्कार

khultabad-ACB

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – अहमदनगर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री हरिष खेडकर यांच्या वतीने नगर येथे खुलताबाद तालूका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालूका अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला असून संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

महाराष्ट्रा राज्य पत्रकार संघ मुंबई औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष प्रभू गोरे यांच्या वतीने खुलताबाद तालूका पत्रकार संघ कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली खुलताबाद तालूका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची कार्यकरणी जाहीर होताच तालूका अध्यक्ष व इतर पदाधिकारी सदस्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे शनिवार रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री हरिष खेडकर यांच्या वतीने अहमदनगर येथे खुलताबाद तालूका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालूका अध्यक्ष राजेंद्र बडे उपाध्यक्ष संतोष करपे कार्याध्यक्ष शेख जमीर सदस्य रमणलाल पंजाबी लक्ष्मण जाधव यांच्यासह इतर सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे सत्कारा दरम्यान पोलीस उपअधीक्षक खेडकर म्हणाले की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई हि संघटना महाराष्ट्रात नावाजलेली संघटना आहे या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोरगरीबासाठी विविध उपक्रम राबविले जातात अशाच पद्धतीने
खुलताबाद तालुक्यात तालूका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने खुलताबाद तालूक्यात गोरगरीबासाठी विविध उपक्रम राबवावे माझा त्या उपक्रमात नक्की वाटा राहिल असे सांगून पत्रकार संघाला पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा दिल्या सत्कारा दरम्यान अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक प्रशांत जाधव विजय गंगूल पोलीस हवालदार तन्वीर शेख यांची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here