बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – भुसावळ शेतीच्या उताऱ्यांबाबत काढलेली नोटिस परत घेण्याच्या मागणीसाठी दोन लाख मागणाऱ्या बोदवड तहसिलदारसह सर्कल व तलाठयास जळगाव एसीबी च्या पथकाने लाच घेताना शुक्रवार 18 डिसेंबर रोजी बोदवड तहसील कार्यालयात रंगेहाथ अटक केली होती. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 22 पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मंगळवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांनी भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. एस. डोरले यांनी तिघांना जामिनावर मुक्तता केली…. (तिघाही आरोपीची जामिनावर सुटका)…. संशयित आरोपी तथा तहसिलदार हेमंत भागवत पाटील (40.रा भरडी ता. जामनेर ह.मु.बोदवड) मंडळधिकारी संजय झेंडू शेरनाथ (47. प्रभाकर हाँलजवळ श्रिराम निवास अपार्टमेंट दुसरा मजला प्लाँट न. 6 भुसावळ) व निरज पाटील प्रकाश पाटील (34 हेडगेवार नगर बोदवड याना मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या एस पी डोरले यांनी प्रत्येकी 25 हजारांचा सॅल्व्सीवर जामिन मंजूर केला. आरोपींतर्फे अँड आर के पाटील अँड आर के पाटील अँड राजेंद्र राँय अँड अव्शिनी डोलारे तर सरकारतर्फे अँड विजय खडसे यांनी बाजू मांडली.







