डिसले गुरुजींची विधान परिषदेवर निवड व्हावी

disale-gurujee

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – सोलापूरच्या रणजितसिंग डिसले गुरुजींची विधान परिषदेत वर्णी लागली तर योग्य निवड झाल्याबद्दल जनता निश्चितच या निर्णयाचे स्वागत करेल.यात मुळीच शंका नाही. रणजितसिंह डिसले या उपक्रमशील शिक्षकाने आंतरराष्ट्रीय मान्यतेचा व मोठ्या रकमेचा (सात कोटी रुपये) युनेस्को व लंडनच्या वार्की फाऊंडेशनचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यातील अर्धी रक्कम सहस्पर्धकांसाठी देण्याचे जाहीर करुन दातृत्वाचा परिचय दिला आहे. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

रणजितसिंह डिसले यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ति व्हावी, जेणेकरुन त्यांच्या विद्वत्तेचा सरकारला व पर्यायाने जनतेलाही उपयोग होईल. आज वर असे अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्तिंना विविध राजकीय पक्ष शाल, श्रीफळ देऊन सन्मानित तर लगेच करतात; मात्र विधीमंडळात योग्य ते प्रतिनिधीत्व न देता त्या जागी लोकांनी नाकारलेल्या, अन्य पक्षांतून आयात केलेल्या व्यक्तिंचे पुनर्वसन करण्यात धन्यता मानतात हे चूकीचे आहे आणि खरोखरच आता हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे , आणि डिसले गुरुजींची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती व्हावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here