दुर्मिळ मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्याला पुण्यात अटक

mandul-sneak

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केले. त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सहकार नगर परिसरातील अष्टद्वार सोसायटीजवळ ही कारवाई करण्यात आली. सौरभ अशोक जाधव (वय – 21, रा. पिसोळी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मांडूळ सापाची नऊ लाख रुपयात विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अष्टद्वार सोसायटी जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात सापळा रचला. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दौंड दुचाकीवरुन तीन व्यक्ती त्याठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस धावले. त्यातील दोन व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरले. दुचाकीवरील सौरभ जाधव याला पोलिसांनी पकडले. त्याच्या दुचाकीच्या डिकीतील पिशवीत पोलिसांना दोन किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप आढळला. आरोपी सौरभ जाधव याने हा साप नऊ लाख रुपये किमतीत विकण्यासाठी पुण्यात आणला असल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here