उमराणे गावाजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

umrane-accident

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मुंबई आग्रा महामार्गावर देवळा तालुक्यातील उमराणे गावाजवळ मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांना मालेगाव हलविण्यात आले आहे.

मालेगावकडून पुठ्ठ्याने भरलेला ट्रक क्रमांक नाशिककडे येत होता. पाठीमागून भरधाव वेगात येत आलेल्या तवेरा कारने ट्रकला धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, तवेराचा चक्काचूर या अपघातात झाला. या अपघातात पाच प्रवासी प्रवास करत होते. पैकी दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगावमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची नावे आणि पत्ता अद्याप समजू शकली नाहीत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here