मुलाच्या स्मरणार्थ ललवाणी परिवाराचा दुर्गम आदिवासी पाड्यावर माणुसकीचा अभिनव जागर

lalvani-parivar-raver

४० कुटुंबीयांना नवीन कपडे, भांडी व एक महिन्याचा किराणा वाटप

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यातील दुर्गम व पोहोचण्यास पायवाट हा जाण्याचा एकमेव मार्ग असलेल्या घाग्या व गारबर्डी धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या पाड्यावर भुसावळ येथील ललवाणी परिवाराने अनोख्या पद्धतीने माणुसकीचा जागर केला. ललवाणी परिवाराने येथील ४० कुटुंबीयांना नवीन कपडे, भांडी व एक महिन्याचा किराणा स्व.स्वप्नील ललवाणी यांचे स्मरणार्थ वाटप केला.

भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ. डी. एम. ललवाणी यांचे कनिष्ट पुत्र स्वप्नील मुंबई येथे बँक आॅफ अमेरीका या बहुराष्र्टीय कंपनीत कार्यरत असताना त्यांना तीव्र हृदय विकारा चा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. सारे काही नीटनेटके असताना हा दुःखाचा डोंगर सहन करणे परिवारास अशक्यप्राय होते. परंतु प्रा.डाॅ. डी. एम. ललवाणी व परिवाराने या अचानक कोसळलेल्या संकटास धिरोदात्त पणे तोंड देत समाजापुढे एक आदर्श उभा

मुलाचे स्वप्न होते भारताची शान वाढावी
स्व .स्वप्नील बालपणापासूनच हुशार होता. तो एम.बि.ए च्या सिईटी त ऊत्तर महाराष्र्टात प्रथम आला होता.त्याचे स्वप्न होते की एक दिवस देशाचे नाव उज्ज्वल करण्यात माझा खारीचा वाटा असेल. त्याचे स्वप्न साकारले पण दुर्दैवाने तो आज नाही. पण तरीही त्यांचे दुःख कवटाळत बसण्यात मी आणि पत्नी शोभा पुत्र सुयश व परिवाराने रंजल्या गांजल्याना सेवा देण्याचे ठरविले आहे. जेणे करुन आमचे जगणे सार्थक होईल.
– प्रा डी एम ललवाणी, भुसावळ

केला. परिवाराने स्व. स्वप्नील ललवाणी यांचा नियोजित वाढदिवस साजरा न करता येण्याचे दुःख न करता गोर गरीब आणि मानवी वस्ती पासून कोसो दूर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धाग्या पाड्यावर व गारबडी धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी कुटुंबीयांना नवीन कपडे, भांडी व एक महिन्याचा किराणा देवून स्व स्वप्नील ललवाणी यांची जयंती साजरी करीत गोर गरीबांचे दुःख हलके केले. तसेच यावेळी लहान मुलांना कधी नव्हे ते बिस्कीट, चॉकलेट, फुगे व खेळणी देखील मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. ललवाणी परिवाराने अनोख्या रीतीने हा माणुसकीचा जागर केल्याने एक नवा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.प्रसंगी प्रा.डाॅ.डी. एम.ललवाणी, शोभा ललवाणी, कुसुंबा खुर्द ग्रामपंचायतीने सदस्य मुबारक तडवी, जागर प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा पंकज पाटील, नलीन ललवाणी, मानस ललवाणी, प्रशांत कोटेचा व कमलेश निकुंभ उपस्थित होते.

 

स्व. स्वप्नील यांची मृत्यू पश्चात बँक ऑफ अमेरिकेच्या असीस्टंट व्हाईस प्रेसीडेंट पदी नियुक्तीचा मेल
स्व. स्वप्नील ललवाणी हे बँक आॅफ अमेरिकेचे इंडिया हेड होते. भारतासह अनेक देशात त्यांना उच्च पदांच्या नोकरी मिळाल्या. उचच्यतम पदावर जाण्याची त्यांची धडपड सुरू होती. स्व. स्वप्नील ललवाणी यांनी मृत्यू च्या दोन दिवस आधी बँक ऑफ अमेरिकेच्या असीस्टंट व्हाईस प्रेसीडेंट पदाकरीता मुलाखत दिली होती. जगभरातुन ७० तज्ञांनी मुलाखती दिल्या होत्या.दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि स्वप्नील यांचे स्वप्न साकारले. त्यांना दोन दिवसांनी बँक ऑफ अमेरिकेच्या असीस्टंट व्हाईस प्रेसीडेंट पदी नियुक्ती करण्यात आल्याचा मेल प्राप्त झाला. अमेरिकेत जेव्हा असे घडल्याचे कळले तेव्हा त्यांनी देखील यावर दुःख व्यक्त केले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here