भुसावळच्या रंगकर्मी कल्पना कोल्हे यांचे निधन

kalpana-kolhe

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी कल्पना नरेंद्र कोल्हे (वय ५२) यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास निधन झाले. सदैव हसतमुख व मनमिळावू असलेल्या कल्पना कोल्हे यांच्या अकाली निधनाने नाट्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कल्पना कोल्हे या बुधवारी सकाळी सात वाजता स्नानगृहात गेल्यानंतर त्यांना हृदयविकाचा झटका आला. या तीव्र झटक्यानेच त्यांचे निधन झाले.

 

कल्पना कोल्हे यांनी अनेक नाटकांमध्ये कामे करुन अभिनयाच्या जोरावर अनेक पारितोषिके प्राप्त केली होती. बृहन्नडा, चिअर्स, बाप, अदर साईड ऑफ मिडनाईट या नाटकातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. बाप या नाटकातील भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्रीचे पारितोषिकही मिळाले होते.

 

कल्पना कोल्हे यांच्यावर बुधवारी रात्री आठ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. यशवंत हौसिंग सोसायटी परिसरातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने नाट्यक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here