पुडक्यातून मोबाईल, गांजा थेट कारागृहात; कळंबा कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ

kolhapur-jail

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – गेल्या महिन्यात तटबंदीवरून टेनिस बाॅल चेंडुतून कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुंडक्यातून चक्क मोबाईल, गांजा थेट कारागृहात फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. सतत घडणाऱ्या घटनांमुळे कारागृह सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

दहा मोबाईल, दोन पेनड्राईव्ह, पाच चार्जर आणि 775 ग्रॅम गांजा आढळून आल्याने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारागृह रक्षक रवींद्र भाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी दुपारी गारगोटी रोडच्या बाजुकडील कारागृहाच्या संरक्षक तट क्र.1 वरून बाहेरून कारागृहात तीन पुडे फेकले. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चारचाकीतून आलेल्या दोघा तरूणांनी हे साहित्य कारागृहात फेकल्याचे दिसून आले. याप्रकरणी अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here