आमदार निधीतून गावांतर्गत पाईपलाईन प्रणालीचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील ढोमणे गावाला घरोघरी नळ पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची पाईपलाईन खराब झाल्याने पाणी असूनदेखील नळाद्वारे पाणीपुरवठा करता येत नव्हता. त्यामुळे ढोमणे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत होते. याबाबत गावाचे सरपंच किशोरभाऊ पाटील व मार्केट कमिटी सदस्य विश्वजीतभैय्या पाटील व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून जुनी नळ पाणीपुरवठा पाईपलाईन बदलून त्याजागी नवीन पाइपलाईन कार्यरत करण्यासाठी ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ढोमणे गावाची पाणीटंचाई मिटून प्रत्येक घरी नळाचे पाणी येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दि.२० डिसेंबर रोजी सदर कामाचे भूमिपूजन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विश्वजीत पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, न्हावे ढोमणे गृप ग्रामपंचायतीचे सरपंच किशोरभाऊ पाटील, आर डी पाटील साहेब, वडाळ्याचे रवी आमले, उपसरपंच दीपक पाटील, ग्रा.पं सदस्य वासुदेव पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, डॉ.गोरख पाटील, मुकुंदा पाटील, संजय पाटील, सुदाम सोनवणे, भगवान सोनवणे, सुनील पाटील, शांताराम पाटील, ग्रामसेवक एच आर पाटील, बारकू सोनवणे, सोनू सोनवणे आदी उपस्थित होते.







