(दीपक सकपाळ)
शब्दांकन – जगदीश का. काशिकर
साहेब आज तुमचा वाढदिवस साजरा केला जात असून तो “संघर्ष दिन” म्हणून आपल्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या तुमचे लाखो चाहते देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत.
कॊरोना महामारी व लॉक डाऊन काळात तुम्ही गरीब जनतेला वाटप केले अन्न व पक्ष्यांना खायला दिले होते धान्य तुमच्या सारखा गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारा नेता नाही कुणी अन्य म्हणून सर्वाना तुमचेच नेतृत्व आहे मान्य कारण तुमच्या व इतरांच्या राजकारणात खूप जाणवते आहे साम्य.
साहेब आजचा दिवस इतिहासात एक संघर्षाचे प्रतीक म्हणून भविष्यात नोंद केला जाईल. कारण आपल्या कार्याची सुरुवात ही तुम्ही विद्यार्थी दशेत असतानाच झाली आहे. आपण समाजातील शोषित पीडित वंचित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर लढा उभारून अन्याय करत असलेल्या व्यवस्था विरोधात संघर्ष नायक म्हणून लढा देणारे एकमेव असे जहाल पँथर चळवळीच्या माध्यमातून विविध आंदोलने करून आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संदेश दिला की शासनकर्ती जमात व्हा. आणि आज आपण समाजाचे प्रश्न सोडवावेत याचं हेतूने केंद्रात दोन वेळा सामाजिक न्याय मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आणि तो तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुमच्या पायाला गँगरीन (पायाचा आजार) असून देखील आपण १६/१८ तास काम करत आहेत याचा ज्यावेळी देशात व राज्यात कॊरोना महामारी विषाणू ची लागण झाली त्यावेळी कडक लॉक डाऊन असूनही तुम्ही गोरगरीब जनतेला अन्न धान्य व प्राणी पक्ष्यांना चारा वाटला त्यावेळी सर्व नेते घरी बसले होते परंतु तुम्ही मात्र जनतेला मदत करत होतात चित्रपट क्षेत्रातील व इतर कलाकारांना देखील मदत केली गरीब कार्यकर्ते यांना त्यांच्या घरपोच किट नेऊन दिली लॉक डाऊन काळात वीज बिल माफ़ करावे ही प्रथम मागणी आपणच केली होती पावसाळ्यात दरड कोसळली तिथे पण तुम्ही भेट दिली कोकणात निसर्ग वाऱ्याने जे नुकसान झाले होते तेव्हा तिथे जाऊन जनतेला भेट दिली पिंपरी पुणे येथे दलित युवकाला मारले त्या ठिकाणी देखील त्या कुटुंबाच सांत्वन करण्यास गेले होते सरकार ला विविध प्रकारच्या सूचना आपण सतत करत होतात आपल्या या सामाजीक कार्याची पावती म्हणून परदेशाने आपला “कॊरोना योद्धा” म्हणून सन्मान केला त्या अगोदर आपणास डी लीट म्हणजे डॉक्टरेट पदवी ने सन्मानित करण्यात आले. बंगाल मध्ये फयान वादळात नुकसान झाले तेथील जनतेला देखील आपण भेट देऊन आलात तुम्ही सन 2020 मध्ये “गो कॊरोना” हा नारा खूप फेमस झाला असून 2021 मध्ये “नो कॊरोना” हा नारा दिला आहे.
साहेब आपल्यावर अनेक जण टीका करताना दिसतात परंतु तुमचं मन इतकं मोठं आहे की आपण त्यांना उत्तरे देत नाहीत कारण त्यांना त्यांची उत्तरे ही कालांतराने आपोआप मिळतात सत्तेत सहभागी होऊन शासनकर्ती जमात बनून गोरगरीब दिन दुबळ्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता असणे गरजेचे आहे त्यामुळे लोकांच्या अनेक समस्या दूर होतात. साहेब तुमच्या निवासी आलेला कार्यकर्ता व जनता हा कधीच उपाशी पोटी किंवा चहा पिऊन गेल्या शिवाय जात नाही तुम्ही मुंबई येथे आलेत हे सर्वांना माहीत होते व मग लोक तिथे जाऊन आपली कामे करून घेतात आपण थकुन आलात तरी पण जेवण न करता रात्री उशिरापर्यंत तिथे आलेल्या सर्व लोकांची कामे पूर्ण करून देतात विशेष म्हणजे आपलं दार हे 24 तास जनतेसाठी खुले असते हेच खरे आहे.
साहेब आम्हाला नेहमी सार्थ अभिमान वाटतो म्हणून विज्ञानाने जर असा शोध लावला असता की वय देखील दान केले जाते असे असते तर आम्ही आमचं वय आपणास जरूर दान केले असते. कारण साहेब आज समाजाला पुढे नेण्यासाठी आपली गरज आहे म्हणून आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो व आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व क्रांतिकारी जयभीम……साहेब !!







