चूगलखोरीचा धंदा येणाऱ्या काळात तेजीत; नगरपालिका निवडणुकीवर अनेक चूगलीखोरांचा डोळा…

dondaicha-nagarpalika

कच्च्या कानाच्या नेत्यांनी,स्वतः खात्री केल्याशिवाय एखाद्याचे आयुष्य खराब करू नये…

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथे येणाऱ्या पुढील वर्षभराच्या काळात वरवाडे-दोंडाईचा नगरपालीकेची निवडणूक आहे. त्यामुळे त्याचे सुतोवाच आतापासूनच अनेकांना लागले असुन, काहींनी पक्षाचा शिक्का पडो न पडो तरी डोक्याला बाशिंग बांधून घेतलेले आहे. मग अशा ह्या परिस्थितीचा फायदा काही चूगलखोरांनी घ्यायला सुरुवात केली आहे व येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवत, गावात कोण चांगला आणि कोण कसा हे दिवसभर यांच्या, त्याच्याजवळ वाखाणत,नेत्याच्या कानात मुताचे(ओतायचे) ही ते सोडत नाही. म्हणून अनेक भावी उमेदवारांनी केलेली वर्षभराची मेहनत वाया जाते. म्हणून कच्च्या कानाच्या नेत्यांनी व भावी उमेदवारी करू ईच्छिणांऱ्या लोकांनी अशा चूगलखोर जमातीपासून कोसो दूर रहावे, असे आजच्या जनमत-च्या माध्यमातून आम्हाला सुतोवाच द्यायचे आहे.

माणसामधली चूगलखोर एक अमानवी जमात आहे.जगातील बहुतेक भांडणे ह्याच जमातीची देणं आहे.चूगलखोरांना ओळखणे सोपे नसते.हि जमात वेळोवळी हवे तसे रुपं पालटणारी असते. आपली कारस्थाने अत्यंत गुप्तपणे यशस्वी करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. ‘कान भरणे’ ही म्हण याच लोकांमधून उदयास आली.चूगलीखोरीचा धंदा नेहमी जोमात असतो.तो एखाद्याच्या घरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवता येतो.हा फार मोठा उद्योग आहे.अनेकांची पोटं यावर भरतात.यासाठी कुठलेही बाह्य भांडवल लागत नाही,फक्त अंगी नीचपणा हवा असतो. नीचपणातूनच चूगलखोरीचा जन्म होतो.

चूगलखोरांनी अनेक चांगली माणसे व चांगली बाब उध्दवस्त करुन दाखवली आहे. चूगलखोरांचा वावर सगळीकडे असतो.कुणाच्या तरी कानाजवळ ते निश्चित सापडतात.इकडचे तिकडे तेल मीठ लावून सांगता येणे हे कौशल्य त्यांच्याकडे असते.आपणास हवे तसे,हवे ते सांगण्याची कला त्यांच्याकडे उपजत असते.या दूर्गुंनाच्या जोरावर अनेकांना देशोधडीला लावण्याचे पातक या लोकांनी केले आहे.ऐकणाऱ्याचे कान कच्चे असतील तर हा धंदा लवकर फोफावतो.ऐकणारा मूर्ख असेल तर धंद्याला बरकत येते.ऐकणारा अंहकारी असेल तर तो अंहकार कसा दुखवायचा याचे बाळकडू या लोकांकडे असते. लोकांना नामोहराम करणे ह्यात यांचे सुख दडलेले असते.चूगलखोरी लिंगभेद करत नाही,जातीभेद मूळीच नाही.हि संपूर्ण जमात एकदिलाने चूगलवादी असतात.यांचे साम्राज्य फार मोठे असते. साम्राज्य निर्माण व नष्ट करण्याचे कसब त्यांच्याकडे असते.

चूगलखोरांना ओळखणे शक्य नसते.आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते.जगातील सर्व कटकटी लावण्याचे काम हिच टोळी करत असते.यांचे विचरण सर्वत्र असते. मानाचे स्थान ते मिळवतात. कित्येकांची मैत्री हे लोक तोडून दाखवतात. यांनी अनेक देश देशोधडीला लावले आहेत.चूगलखोर हा न दिसणारा शत्रू आहे.त्याची फक्त लक्षणे आहेत.परिणाम आहे पण तो दिसत नाही,तो महामारी सारखा पसरत आहे.अनेक निरपराध,निरोगी लोकांचे तो बळी घेत आहे.किमान त्यांच्यापासून सावध असले पाहिजे.ही लोक बहुदा गोड गोडबोली असतात.गुळात विष घालून देणारी असतात.आम्हाला तुमची खूप काळजी असे दाखवतात.आम्हीच तेवढे शहाजूक बाकी बेअक्कल अस त्यांना वाटत.लावालावी करणारे कितीही असो, परंतु ऐकणारे कच्च्या कानाचे असू नयेत.

चुगल्या लावणाराचं वाटोळ हे निच्छित असतं पण तोपर्यंत दुसरा पुर्ण तळाला गेेलेला असतो.म्हणून नेत्यांना परत ऐकदा सांगतो की,नुसतं कानाने एैकुन डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कोणताही गंभीर निर्णय घेऊ नये व एखाद्याची मेहनत,आयुष्य खराब करू नये..उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तूमच्या सभ्यतेचा विजय समजा.तसेच वर्षभर निवडणूक लांब असल्याने, अश्या निवडणूकीवर डोळा ठेवून असलेल्या चूगलीखोर जमातीपासून प्रत्येकाने लांब रहावे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here