सोशल मीडियासह सर्वदुर फोफावलेले गायब,आजही ऐन थंडीच्या कडाक्यात गरिबांना मदतीची गरज…
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – सुरूवातीला जसा करोना आजार भारतात, राज्यात, जिल्ह्यात, गावागावात व खासकरून आमच्या गावात जसा दिसायला, लक्षात आला.त्यावेळी चौफेर, सर्वदूर ,कान्याकोपऱ्यात गरीबाला मदत पुरविण्यासाठी दिवसरात्र, कोण कशी मदत करत आहे, हे प्रसिद्धी माध्यम वर्तमानपत्र, सोशल मीडिया वाट्सप ,फेसबुक, ईन्स्ट्राग्राम असे विविध माध्यमातून जो नाही तो गरिबांनसोबत फोटो काढून(ज्यांनी खरोखर मदत केली, त्यांच्या बाबतीत तिळमात्र शंका नाही. मात्र ज्यांनी एक गरिबसोबत फोटो काढून, परिस्थितीची जी प्रसिद्धी मिळवली आहे, त्यांच्यासाठी खास…) गावात जसा एकमेव दानवीर असल्याचा प्रसिद्धी फेम आणत, मिरवत होते. मग महिन्याच भरानंतर,आजपर्यंत कुठे गेले हे अधिका..प्रसिद्धीखोर,असा संप्तत सवाल जनसामान्यात निर्माण होत .तसेच आताही ऐन कडाक्याच्या थंडीत गरिब,भिकारी,अपंग,मनोरूग्ण, वेडसर,हताश व्यक्ती ऊबदार कपडे व उपाशीपोटी “न मागता येई,ना जगता येई” अशा गंभीर परिस्थितीतुन अनेकजण जीवन मार्गक्रमण करत आहे. म्हणून फोटो का काढत नाही, सोशल मिडीयावर का टाकत नाही, पण गरजूंना मदत करा,असा सुरू संबधित परिस्थितीला समोरून जाणाऱ्या गरिब, भिकारी, मनोरुग्ण, वेडसर व्यक्तींच्या दैनंदिन देहबोलीतून निघत आहे.
करोना आजार तसा पाहिला तर आजही पुर्णतः भारत देशातून हद्दपार झालेला नाही आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला अजून पुढील एक वर्षे काळजी घ्यायचे सांगत आहे. तर काही ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी यांनी परिस्थिती पाहून, महानगरपालिका हद्दीत रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करून दिली आहे. ह्या सर्व परिस्थितीत जनता आपले दळणवळण साहित्यासह, दैनंदिन रोजभाग मिळवत ,जीवन पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आजही नीटनेटकी,पुर्वपरिस्थिती आणत प्रत्येकाचे पुढील एक वर्ष तरी लोटले जाईल. आज राज्यातील बरीचशी रोजगार उपलब्ध करणारी संस्था, कारखानदारी,कंपन्या, बडे उद्योग थप्प आहेत किंवा मागणी नसल्यामुळे सुरु होण्याचा मार्गावर आहेत. म्हणजे एखाद्या उद्योगाला ग्राहकांची मागणी नसेल तर तो पुरवठा कुठून करेल आणि मागणी असेल, कच्च्या माल असेल.पण निर्मिती, उत्पादनसाठी मनुष्यबळ नसेल तरी तो मागणीनुसार पुरवठा करू शकत नाही. म्हणून ह्यासारख्या व इतरही अनेक कारणांमुळे राज्यात मोठमोठे उद्योग धंदे, कंपन्या, कारखाने डबघाईस चालू आहेत. पुर्वपदावर येत ,येत वर्षभर तरी लागेल. कारण शहरामधून गावामध्ये आलेल्या व्यक्ती व कुटूबांची अजूनही शहरात परत रोजगार मिळवण्यासाठी जायची मानसिकता झाली नाही आहे. मग ग्रामीण भागात ,लहानसहान शहरात सर्वांना एकाचवेळी ऐवढा रोजगार कुठून मिळेल. म्हणून बेरोजगारी, उपासमारीचा आकडा सर्वदूर वाढत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, कुठे उमटून येत आहे, तर काही ठिकाणी दिसून येत नाही आहे.
आता ही झाली सुशिक्षित, मोठमोठ्या शहरामधील बेरोजगारी. आम्हाला हा विषय वाढवत न घेता,थोडक्यात म्हणायचे असे आहे की,करोना आजारामुळे देशातील दहा ते पंधरा टक्के लोकांचे जीवन जैसै थे सोडले तर जवळपास ऐंशी ते पच्च्याऐंशी लोकांचे जीवनमान बदलून गेले आहे. राज्यातील जनता नोकरी,रोजगार, उद्योग धंदे, व्यापार, व्यवसाय थप्प होऊन गेल्यामुळे हाताला, रोडावर मिळेल ते काम करून ,कुटूबांचा चरितार्थ चालवत आहे. शिक्षण, डिग्री, कारखानदारी, वतनदारी सोडून, जो तो शेती,भाजीपाला, किराणा दुकान आदी जमीनीशी निगडित, खालच्या लेव्हलने विचार करत आहे. म्हणून समाजात आज पर्यंत जी दरी निर्माण केली जात होती. ती आतातरी थोड्याफार प्रमाणात नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. तरी सुरूवातीच्या करोना काळात जी काही पैशाच्या जोरावर तोतांड मांडणारी मंडळी होती. ती रोज गरिब, बेबस, हताश,बेरोजगार माणसाला, कुटूबांला कशी भरभरून मदत करत आहे, असे फोटो विविध प्रसार माध्यमामार्फत सार्वजनिक करत, गुपीत दानाचा ,गरिबीचा बाजार मांडून ठेवला होता. म्हणून आताही परिस्थिती करोना व पुढील झालेल्या परिणामामुळे फक्त श्रीमंत व मध्यमवर्गीय कुटुंब, व्यक्ती व्यवस्थित जीवन जगत आहे. बेरोजगार, गरिब, भिकारी, अपंग, मनोरूग्ण, वेडसर यासह इतर तत्सम पीडित लोक आजही दोनवेळच्या व्यवस्थित जेवनापासुन वंचित आहेत. तसेच वरून थंडीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उबदार कपड्या अभावी त्यांचे जीवन बत्तर होऊन जात आहे. म्हणून करोना काळात फुकटच्या ,तोतांड प्रसिद्धीसाठी हपापलेली मंडळी, ऐन थंडीच्या काळात,अजुनही करोना गेलेला नाही आहे, मग कुठे गेले हे सर्व, हे सहाजिकच वरील सदरील परिस्थितीला दैनंदिन तोंड देणाऱ्या मंडळीच्या देहबोलीतुन चित्र समाजात उभे राहत आहे.




