शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – राष्ट्र सेवा दल तर्फे साने गुरुजी जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय अवगेजुनवने ता शहादा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सानेगुरुजी यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद श्रीपत पाटील तर प्रमुख पाहुणे स्वंथेचे उपाध्यक्ष उद्धव भबूता पाटील ,राष्ट्र सेवा दलाचे माणक पुरुषोत्तम चौधरी,मुख्याध्यापिका सौ पद्मा कैलास पाटीलआदी उपस्तिथ होते

कार्यक्रमात माणक चौधरी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले सानेगुरजी भारत देश घड़वीणाऱ्या पैकी एक होते त्यांना जीवनात कधीही स्वार्थ शिवला नव्हता त्यांना असे वाटत होते स्वातंत्र्या नंतर भारतात सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे, पण तसे घड़तांना दिसत नसल्याने त्यांना खुप दुःख होत असे या नंतर गोविंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
या नंतर विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये समाजातील एकोबा कमकुवत होईल असा एकही म्यासेज फॉरवर्ड करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदमा पाटील यांनी व सुत्रसंचलन आर बी निकम यांनी कले तर आभार हरिशकुमार पाटिलयांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठीस्वप्निल पाटिल, विलास पाटील, प्रकाश पाटील,रीता पाटील, रविंद्र शिरसाठ, अशोक भंडारी,लक्ष्मीकांत शिरसाठ, परिश्रम घेतले







