जळगाव (संपादक सुनिल पाटील) – काल (दि. १०) गोलाणी मार्केटमध्ये दहा वर्षीय निरागस बालिके वर झालेल्या अत्याचार प्रकरणी
पोलीस अधीक्षक कार्यालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले शिक्षक भारतीच्या अध्यक्ष शीतल ताई जडे, बीजेपी युवा महानगर उपाध्यक्ष राहुल भाऊ लोखंडे ,पोलीस सेवा संघटना अध्यक्ष भावेश ठाकूर, हर्षाली पाटील, प्रा, रफिक शेख यांनी भेट घेवून त्वरित कारवाई करण्यासंदर्भातील निवेदनत दिले.
तसेच कोरोना काळातील अहोरात्र बंदोबस्ताच्या कामासाठी परिश्रम घेतल्याबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा जनमत प्रतिष्ठानतर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पंकज नाले व शीतल ताई जडे, हर्षाली पाटील, प्रा रफिक शेख बीजेपी युवा महानगर उपाध्यक्ष राहुल भाऊ लोखंडे पोलीस सेवा संघटना जिल्हाध्यक्ष भावेश ठाकूर उपस्थित होते.







