पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – ज्ञानज्योती,क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले यांची जयंती दिवस शिक्षिका दिन म्हणुन साजरा करण्यात यावा शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् अशोक रावसाहेब पवार यांनी ना. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य मागणी केली होती.
सावित्रीबाई बाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी ला असून त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठत भिडे वाड्यात महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु करुन मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडी केली.त्यावेळी त्यांनी स्त्रीयांसाठी शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्यध्यापिका होत्या, त्यांना सुरवातीला अनेक हाल , त्रास सहन करावा लागला,परंतु मुलींच त्यांनी शिक्षणासाठी शाळा चालू करून एक आदर्श घडविला. त्यामुळे आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया अग्रेसर आहे, हे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.
सवित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महान कार्याबद्दल ३ जानेवारी हा जयंती दिवस “शिक्षिका दिन” म्हणुन साजरा करण्यात यावा,अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापु पवार यांनी ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली होती.
प्रथम शिक्षिका सावित्रीबाईफुले यांची जयंती दिवस “शिक्षिकादिन” म्हणून साजरा करण्यात यावा या आमदार अशोक बापू पवार यांच्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे आता सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे “शिक्षिका दिन” म्हणून महाराष्ट्रात साजरी होणार आहे.







