मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – बोरीवली (पश्चिम) पोलीस स्टेशन येथे प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी महिला तक्रार निवारण दिन असतो. दिशा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष्या दिशा प्र. कळंबे विभागातील महिलांच्या समवेत विभागात येता – जाता मुलींची होणारी छेड़छाड़, घरगुती मारहाण – भांडणे, दारु पिऊन रस्त्यावर रात्रीच्या वेळी त्रास देणारे तरुण आणि पुरुष यांच्या संबंधित तसेच पोलीस पेट्रॉलिंग वाढवावे. अशा तक्रारी घेऊन तेथे आल्या असता त्या सर्व तक्रारींचे निरसन आणि उपाय तेथील पी. एस. आय. दीप्ती शिंदे यांनी स्वतः केले. तसेच महिलांना सांगितले की, तुम्ही कोणतीही तक्रार घेऊन या मी नक्कीच योग्य ते सहकार्य करेल. यावेळी अरविंद घाग पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे उपस्थित होते. त्यांनीही महिलांना चांगले मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या मुंबई उपनगर जिल्हा संघटक दिशा कळंबे यांनी पोलीस निरीक्षक अरविंद घाग यांना नशाबंदी मंडळाचे पत्रक देऊन संस्थेच्या कार्याविषयी त्यांना माहिती दिली असता. बोरीवली पोलीस स्टेशन येथे व्यसनमुक्तिचा कार्यक्रम लवकरच घेऊ असे पोलीस निरीक्षक यांनी आश्वासन दिले.







