श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी प्राचार्य डॉ..जयसिंगराव देशमुख यांची निवड

jaysingrao-deshmukh

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या आजीव सेवकपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी या अगोदर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या, उस्मानाबाद येथील उपकेंद्रात संचालक म्हणून कार्य केले होते.

तसेच ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या व्यवस्थापन परिषदेचे विध्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.ते सध्या उस्मानाबाद जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून हि कामकाज पहात आहेत. या अगोदरच त्यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या व्यवस्थापन मंडळात सदस्यपदी निवड झाली होती.सध्या ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण ,मुंबईच्या उस्मानाबाद विभागीय केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून हि कार्य करत आहेत.

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली आहे या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे ,संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे , सहसचिव (प्रशासन)प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,सहसचिव अर्थ प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ यांनी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुखांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे तर प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी वरील संस्था पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here