परितेवाडीत तीक्ष्ण हत्याराने युवकाच्या डोक्यात वार करत निर्घृण हत्या

paritewadi-murder

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – माढा तालुक्यातील परितेवाडी गावात अज्ञात मारेकर्‍यांनी तीक्ष्ण हत्याराने युवकाच्या डोक्यात वार करत निर्घृण हत्या केली. सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय 21 वर्षे, रा. परितेवाडी, ता. माढा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी परितेवाडीचे पोलीस पाटील जिंदास बाळू हराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात 25 डिसेंबरला अज्ञाताविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परितेवाडी गावातील काही युवक मळ्यावरच्या सारीमध्ये गेले असताना तिथे त्यांना एका युवकाचा रक्ताळलेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला दिसला. त्या युवकांनी परितेवाडी गावचे पोलीस पाटील जिंदास हराळे यांना फोनद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील हराळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत माहिती दिली. सिद्धेश्वर जाधव हा कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे घरी सांगून निघाला होता. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत सिद्धेश्वर हा घरी परतलाच नव्हता, अशी माहिती भाऊ बालाजी जाधव यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here