पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केला 57 हजाराचा अवैध गुटखा

pune-guthkha

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ग्रामीण पोलिसांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पौड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 57 हजार रुपयांचा गुटखा पकडला. गुटख्याची अवैध्य वाहतूक होत असताना ही कारवाई करण्यात आली.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक वॉण्टेड गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पौड पोलिसांबरोबर पेट्रोलिंग करत होते.

दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना पिरंगुट गावचे हद्दीत लक्ष्मी नगर,येथे पिरंगुट ते घोटावडे फाटा रोडचे कडेला पूना ट्रेडिंग या दुकानासमोर एक चॉकलेटी रंगाची टिव्हिएस कंपनीची ज्युपिटर दुचाकीवर इमामुद्दीन गफूर खान व(32 रा.लक्ष्मी नगर, पिरंगुट ता. मुळशी) फूट रेस्टच्या मोकळ्या जागेत व मागच्या सीट वर अशी दोन पोती वाहतूक करीत असताना मिळून आला.

त्याचे ताब्यातील मालाची पाहणी केली असता विविध प्रकारचे पानमसाला, सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्‍स असे एकूण 2 पोती, 1 दुचाकी व रोख रक्कम असा एकूण किंमत रुपये 57 हजार 908 चा मुद्देमाल मिळून आला. त्याबाबत इमामुद्दीन गफूर खानला पुढील कार्यवाही करीता पौड पोलिसांचे ताब्यात देणेत आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,सहायक फौजदार दत्ता जगताप, पोलिस हवालदार आर.बी.पुणेकर, पोलिस नाईक सागर चंद्रशेखर, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, महिला पोलिस कॉन्स्टेबल एस.एस.कदम, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here