अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.अथांग असा समुद्र, मंदिरं, प्रसिद्ध अशी ठिकाणी, नारळ पोपळीनी वसलेल्या वाड्या टूमदार घरे गावं आणि सर्वत्र हिरवाई असं वातावरण सध्या जिल्ह्यात असल्याने त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. दरम्यान, नाताळ, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यासाठी स्थानिक व्यापारी आणि नागरिक देखील सज्ज झाले आहेत.
काशीद नागाव, अलिबाग -मुरुड या तालुक्यांमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणं असल्याने सध्या पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे. कोरोनाकाळानंतर सर्व सुखसोयींनीयुक्त अशी जिल्ह्यातील ठिकाणं आहेत. जिल्ह्यात अद्याप तरी कोणतेही कडक असे निर्बंध नाहीत. पण, येणाऱ्या पर्यटकांनी, व्यापाऱ्यांनी आणि स्थानिकांना कोरोनाकाळातील नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुरुड काशीद नागाव अलिबाग किहीम मध्ये पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे समुद्र किनार्यावरील बहुतेक रिसॉर्ट हाऊस फुल्ल झाली आहेत. आपल्या पर्यटन व्यवसायाला आता पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची पर्यटन व्यवसायिकांना आशा निर्माण झाल्याने पर्यटकांच्या अलिबाग ला येण्याने अलिबाग मुरुड तालुका पर्यटन व्यावसायिक चांगलेच सुखावले आहेत.







