मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, संपादक, साहित्यिक, समाजसेवक, निर्माता व दिग्दर्शक डॉ. शांताराम कारंडे निर्मित व दिग्दर्शित डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत सिद्धांत पिक्चर्सचा नवीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित चित्रपट “आक्रीत” मधील “धिंगाणा” गीत यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले. सदर चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रो. विवेक शिंदे सर व अभिनेत्री संजीवनी जाधव आहेत. सोबत प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जयंत, दिपाली मोरे, भाऊ कदम व डॉ. शांताराम कारंडे देखील आहेत.

सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते असलेले डॉ. कारंडे व्यवसायाने आर्किटेक्ट व बिल्डर असून त्यांना मराठी नाटक व चित्रपट निर्माण करण्याची आवड आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आत्तापर्यंत १३ मराठी नाटक व १५ मराठी, हिंदी व तामिळ शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. लवकरच त्यांचा आक्रीत हा मोठ्या पडद्यावरील सिनेमा येत आहे.
डॉ. कारंडे यांचं साहित्यिक क्षेत्रातदेखील मोठं योगदान आहे. त्यांचे आत्तापर्यंत १० कथासंग्रह, ११ कवितासंग्रह व शेकडो विविध विषयांवरील लेख प्रकाशित आहेत. काळजाचा वेध घेणारा संवेदनशील मराठी चित्रपट आक्रीत मधील गाणे पाहण्यासाठी
या लिंकवर प्रेस करा…







