कामोठे (रायगड) (उपसंपादक हतोडकर सर) – कामोठे पोलीस ठाणे गुन्हा रजि. न ०५४५/२०२० भादवि कलम ३०७, ३२४, १४३, १४४, १४९, ३२३, ५०४ आर्म अॅक्ट ३, २५ मधील फिर्यादी मयुर बबन जाधव, वय २७ वर्षे यांचा मोठा भाउ योगेश बबन जाधव, वय – २९ वर्षे रा. डी/००३, गुरू प्रेम कॉम्पलेक्स सेक्टर ०४, कळंबोली, नवी मुंबई हे दि. २६/१२/२०२० रोजी रात्री ०९.३० वा. च्या सुमारास देशी ढाबा ‘ या हॉटेल मध्ये त्यांच्या मित्रांसह मदयप्राशन करत असतांना त्यांचे जुन्या ओळखीचे मॅडी उर्फ मधुकूमार सुदन व त्याचे साथीदार राकेश ठाकर, मोहन गवडा. विजय नाडर, अली, थापा, तेजस, गौरव, अमय, व नंदकिशोर हे देखिल त्या ठिकाणी आले त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. त्याचा राग मनात धरून फिर्यादी यांचा भाउ हे हॉटेल मधुन बाहेर आल्यावर आरोपीत इसमांनी आपसात संगनमत करून बेकायदेशिर जमाव जमवन फिर्यादी यांना मारहाण केली.
त्यादरम्यान आरोपीत नाम अली याने पिस्तुल काढुन पहिल्यांदा हवेत फायर करून दुसरा फायर फिर्यादी यांच्या भावास जीवे ठार मारण्याच्या उदद्देशाने त्यांच्या दिशेने फायर केला असता फिर्यादी यांनी तो चुकवल्याने त्यांना गोळी लागली नाही. म्हणुन आरोपीतांनी त्यांच्या डोक्यास दगड मारून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या ताब्यातील टाटा नेक्सॉन कार तसेच इतर दोन कार व मोटार सायकल वरून पळुन गेले. म्हणुन वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल होताच यातील फिर्यादी यांच्याकडे सविस्तर विचारणा करून आरोपीतांबाबत गुप्त पणे माहीती प्राप्त करून आरोपीत हे कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ व कामोठे परिसरात असल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्याने लागलीच पोलीस ठाणे येथून पोलीस पथके आरोपीतांचा शोध घेणेकामी रवाना झाले. त्यांनी नवी मुंबई, चेंबूर परिसरात राहणाऱ्या सात आरोपितांना अटक केली.
या आरोपीतांकडुन गुन्हयात वापरण्यात आलेला १२ हजार रू. कि. चा गावठी कटटा (अनिशस्त्र), ७ लाख ५० हजार रू. कि. ची टाटा नकरान कार क्रमांक एम एच ४३बी टी 30, ४ लाख ५० हजार रू. कि. ची वोल्सवगन बन्टो कार कं. एम.एच. ०३ बी डब्ल्य ३९७४, ३ लाख ५० हजार रू. कि. ची. वोल्स वन कार कं. एम.एच. ४३ ए एल ७६६९, ५० हजार रू. कि. ची बजाज पल्सर मोटार सायकल कं. एम.एच. ०३ सी डब्ल्यु ९३३७, ६७ हजार रू. कि.चे मोबाईल असा एकुण १६ लाख ७९ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी बिपीन कुमार सिंह, पोलीस आयुक्त., जय जाधव पोलीस सह-आयुक्त, सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ वाशी, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- २, पनवेल, रविंद्र गिडडे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग., संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे पो. ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम जगदाळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सा नि महाला यांनी पोहवा/१३२७ पाटील, पोना/२३०१ पवार, पोना/३००८ काळे, पोना/२६९५ काळे व पोशि/१२५५७ पाटील यांच्यासह केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. उत्तम जगदाळे हे करित आहेत.







