धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव येथील विश्रामगृहात शिवसेना महाराष्ट्र ग्रंथालय सेनेची जिल्हा बैठक प्रदेश अध्यक्ष बी.जी देशमुख परभणी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. त्यांचा सत्कार महाराष्ट्र उपप्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी केला.
स्व: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रभर ग्रंथालय सेना साहेबांच्या जन्मदिवस सामना वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय सेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत धरणगाव येथे सदर कार्यक्रम पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.
या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष बी.जी देशमुख, उपप्रमुख पी एम पाटील, शब्बीर शहा, शेख अरशद, श्री जावळे, रवी पाटील, रावसाहेब पाटील, दिलीप पाटील, श्री जावरे आदी उपस्थित होते.







