राज्याध्यक्ष उदयजी शिंदे यांच्या हस्ते, उस्मानाबाद जिल्हा शिक्षक समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

shikshak-samiti-usmanabad

लातूर,उस्मानाबाद,सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचीही घेतली भेट

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष मा.श्री. उदयजी शिंदे यांनी आज दि.२८ डिसेंबर सोमवार रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

सर्व प्रथम शिक्षक समिती शिक्षक नेते,शिवाजीराव साखरे पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्या मुळे लातूर येथे सांत्वनपर भेट घेतली.. शिक्षक समितीचे माजी मराठवाडा अध्यक्ष श्री.ब्रिजलाल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही देण्यातआल्या. याप्रसंगी यावेळी शिक्षक समितीचे शिवाजीराव साखरे पाटील,राजन सावंत,अरुण सोळूंके(जि.प.स्विक्रुत सदस्य तथा चेअरमन) किशनराव बिराजदार(जिल्हाअध्यक्ष शिक्षक समिती जिल्हा लातूर), कुलदीप पाटील सरचिटणीस संजय सुर्यंवशी, कार्याध्यक्ष विकास पुरी,अशोक घोटे,पाटील सि के,सांगवे व्ही.एन.विष्णुकांत धुमाळ,पाटील बी.एम,गणेश गायकवाड,कवाळे एस.बी., महिला प्रमुख रंजना चव्हाण,शेरे राजश्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तद्नंतर राज्याध्यक्षांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा शिक्षक समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शिक्षक समितीचे कल्याण बापू बेताळे,राजन सावंत (सोलापूर) बशीर तांबोळी,विलास कंठेकुरे,बाळासाहेब वाघमारे, सह उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष,तालुका पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक समितीचे सदस्य उपस्थितहोते.

कार्यक्रमात तालुका जिल्हा पदाधिका-यांना निवडीचे पत्रही राज्याध्यक्षांच्या हस्ते यावेळी देण्यातआले. आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर्स अवाँर्ड प्राप्त शिक्षक रणजित डिसले गुरुजींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्याध्यक्ष उदयजी शिंदे यांनी कार्यकर्त्यांशीही विविध विषयांवर चर्चा केली.त्यात प्रामुख्याने जुनी पेन्शन, आंतरजिल्हा बदली, वेतन आयोगाच्या त्रुटी, कोविड योध्द्यांना आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कुर्डूवाडी येथील शिक्षक समितीचे गोकूळ सुरवसे यांच्या तब्येतची विचारपूस केल्यानंतर तालुक्यातील पदाधिका-यांशी मनमोकळेपणाने विविध विषयांवर संवाद साधल्याचे औरंगाबाद जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, कार्याध्यक्ष के.के.जंगले.संजय शेळके (तालुका नेते)दत्ता खाडे (तालुकाध्यक्ष),विलास साळुंखे(तालुका सरचिटणीस),मच्छिंद्र निमोणे (कार्याध्यक्ष),अतूल गायके(संपर्क प्रमुख),वासुदेव कोळी(कोषाध्यक्ष),निंबा साळुंके,वैशाली हिवर्डे,(खुलताबाद तालुका शिक्षक समितीच्या महिला तालुकाध्यक्षा) उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here