औरंगाबाद (प्रतिनिधी) – राजकीय तुफान वृत्तपत्राचे संपादक अफसर खान यांच्या वरील फुलंब्री पोलीस ठाण्यांमध्ये 3/12/ 2020 रोजी त्यांची मुलगी आणि इतर एक असे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे . परंतु हा गुन्हा खोटा असल्याचे अफसर खान यांचे म्हणणे आहे.
त्यानुसार औरंगाबाद शहरातील विविध वृत्तपत्राच्या संपादक मंडळांनी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन तर्फे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन सादर केले. अफसर खान यांच्यावरील गुन्ह्याची वरिष्ठांमार्फत चौकशी करावी आणि त्यांना न्याय द्यावा चौकशीत जर अफसर खान यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास ते कार्यवाहीस सामोरे जाण्यास तयार आहेत परंतु हा गुन्हा खोट्या स्वरूपाचा असून त्याची चौकशी करूनच खान यांच्या वरील लावण्यात आलेले आरोप मागे घेऊन दोषींवर कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात मी स्वतः लक्ष देऊन चौकशी करत योग्य कार्यवाही करेल असे आश्वासन दिले या प्रसंगी अजमत पठाण, मोहसीन खाॅन, सलीम सिद्दीकी, गणेश महाले, जब्बार खान, इसरार खान, जफर खान, जावेद खान, शफी मिर्झा बेग, रहीम खान आदिंची उपस्थिती होती.







