पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर मित्राने केला बलात्कार

rape-on-airhostage

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर मित्राने एअर होस्टेस तरुणीला हॉटेलवर नेऊन जबरदस्ती दारू पाजली. तिला घरी आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पुण्यातील वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अभिजीत असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काळेवाडीतील तापकीर नगर चौकात राहतो. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि आरोपीची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला शनिवारी दुपारी हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेले. तिथे तिला जबरदस्ती दारू पाजली. आरोपीने तिला त्याच्या घरी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मित्राच्या या कृत्याने हादरलेल्या तरुणीने त्याला विरोध केला. त्यावरून आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असेही तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here