कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक

dilip-chabriya

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – प्रसिद्ध कार डिझायनर आणि डिसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्य़ात अटक केली आहे. छाबरिया यांच्याकडून डिसी कार पोलिसांनी जप्त केली आहे.

सेलिब्रिटीच्या कार डिझायन करणाऱ्या छाब्रिया यांच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींचा गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने तपास केला. छाबरिया यांचा यामध्ये सहभाग आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here