खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील झरी- वडगाव रस्त्यावर एका इसमास तीन फूटी तलवारीसह बाजारसावंगी पोलीसांनी मुसक्या आवळून २९ डिसेंबर रोजी ४ वाजता अटक केली. खुलताबाद तालुक्यातील झरी वडगाव या रस्त्यावर एक इसम तीन फुटी नंगी तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची खबर खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांना खबरी द्वारा मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांनी बाजारसावंगी दुरक्षेत्र पोलीस चौकी पोलिसांना याची माहिती देवून कारवाईचे आदेश दिले. त्यावरुन चौकीतील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेवून झरी-वडगाव.

रस्त्यावर धाव घेतली. व तेथे सोनू पिता अमरसिंह मोरे वयवर्ष १९ रा. खारगुन रहीमपुर ता. जि. खारगुन मध्यप्रदेश. हल्ली मुक्काम गंगाधर संपत गायकवाड यांच्या शेतात. ता. खुलताबाद. त्यास पकडून त्याच्याकडून तीन फुट लांबीची धारदार तलवार अंदाजे किंमत २०००/रुपये. जप्त केली. व दोन पंचासमक्ष २९ डिसेंबर रोजी चार वाजता पकडून कारवाई केली. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व पोलीस उपाधिक्षक पैठण चार्ज कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे, सहा पोनि किरण आहेर, पोह/संजय जगताप, पोह नवनाथ कोल्हे, पोना/विनोद बिघोत, पोकां /योगेश नाडे व संतोष पुंड यांनी कारवाई केली.







