खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी 232 उमेदवारी अर्ज दाखल

khultabad

प्रतिस्पर्ध्याला कचाट्यात गाठण्यासाठी गावागावात डावपेच सुरु.

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण 232 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतनिहाय प्राप्त उमेदवारी अर्ज दाखल झाले ते याप्रमाणे आहेत.
वेरुळ ( 23 ), पळसवाडी (6 ), कसाबखेडा ( 27 ), टाकळी राजाराय (21), म्हैसमाळ (15), बाजारसावंगी ( 13 ), झरी – वडगाव (8), पिंपरी (3), सुलतानपुर (3), बोडखा (11 ), गदाना(3), सोनखेडा(13), खिर्डी(14), कागजीपुरा (7), मावसाळा(17), कनकशिळ(11), ताजनापूर (8), निर्गुडी बुद्रुक (1),सराई (8), वडोद बुद्रुक (10), भडजी – ममनापूर(9) असे एकूण 232 अर्ज प्राप्त झाले आहेत तर तालुक्यातील खांडी पिंपळगाव, गोळेगाव,
धामणगाव, गल्ले बोरगाव या ग्रामपंचायतीसाठी आजपर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाले नाही.

khultbad1

खुलताबाद तालुक्यातील 25 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू असताना भावी ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक आयोगाचे ऑनलाईन वेबसाईटवर उमेदवारी अर्ज ऑनलाईन करतांना आज सकाळ पासून तालुक्यातील प्रत्येक सेतू ई सेवा केंद्र व सायबर कॅफे वर सर्वर डाउन झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती. मात्र या तांत्रिक प्रकरणामुळे गंभीरताने दखल घेऊन खुलताबाद भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे व शहराध्यक्ष सतीष दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देऊन भावी सदस्यांची होत असलेल्या अडचणीचे चित्र निदर्शनास आणून दिले.

राज्य भरात वेबसाईटवर होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आता निवडणूक आयोगाने देखील याची गंभीरताने दखल घेऊन इच्छुक उमेदवारांना आता ऑफलाइन स्वरूपाने अर्ज दाखल करण्याचे व अर्ज दाखल करण्याचे वेळ वाढून दिले आहे.या प्रसंगी उमेदवारांची आता सांयकाळी 05:30 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. कोणत्याही भावी ग्रामपंचायत सदस्य उमेदवारी दाखल करण्यास वंचित राहु नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने भावी सदस्याांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक कापसे,पी.बी गवळी,डी.पी गोरे,तलाठी विनोद जाधव,विनेश महेर,भगवान घुसळे,अशोक गर्गे आदि परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here