संचमान्यता शिक्षणउपसंचालक स्तरावर – शिक्षणराज्यमंञी ना.बच्चु कडू

vardha

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – विमाशि सघ,राज्यातील शिक्षक , मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची ना.बच्चु कडू यांनी तक्रारीवर आज दि.३० डिंसे.२० ला जवाहर बालभवन शिक्षणउपसंचालक कार्यालय,मुंबई येथे बैठक आयोजीत केलेली होती.

संचमान्यता आँनलाईन,पोर्टल उपलब्ध होत नसल्यास कनिष्ठ महा.प्रमाणे आँफ लाईन करावी,ती शिक्षणाधिकारी यांनी करून शिक्षण उपसंचालक यांचेकडे अपिल असावे,राज्यातील सर्व शिक्षणउपसंचालक स्तरावर बैठका निश्चित करण्यात येत असल्याचे ना.बच्चु कडु यांनी शिक्षण संचालक, दत्ताञय जगताप यांना र्निदेश दिले.खोटी पटसंख्या दाखविल्यास दंडात्मक तरतुदीच्या सुचना असाव्यात.वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणात मुळ शासननिर्णय दि.२ सप्टे.१९८९ मधे प्रशिक्षण उपलब्ध नसल्यास प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या अटीवर,प्रशिक्षणातुन सुट देवुन वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी लागु करावी.शिपाई हा महत्वाचा घटक आहे,प्रशासकीय यंञनेत या घटकाला कमी वेतनश्रेणी आहे,मानधनावर नियुक्ती शासन निर्णय दि.११ डिसें. २०२० रद्य करावा.शिक्षणमंञी यांचेसोबत चर्चाक़रून विषयाची सोडवणुक करण्याचे ना.बच्चु कडु यांनी स्पष्ट केले.

vardha-teacherशिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या शालार्थ आयडी यासंबधी शासननिर्णय दि.१४ आँगष्ट २०२० मधिल मा.आयुक्त(शिक्षण) व सहसंचालक (प्राथ.)यांच्या समितीने तक्रारी व अनियमितता तपासावी.नागपुर जिल्ह्यातील माध्य.शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी दोन रिक्त पदे तातडीने भरावेत.विमाशि संघाने आयुक्त(शिक्षण) याचेकडे भ्रष्टासंबधी केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात येईल असे ना.बच्चु कडु यांनी आश्वासित केले,चर्चेत ना.बच्चुभाऊ कडु,व्ही.के.खांडकें(सहसंचालक)दत्ताञय जगताप, (शिक्षणसंचालक)राजेश शिंदे,अधिक्षक,विमाशि संघाचे प्रमोद रेवतकर,अनिल गोतमारे व इतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here