शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्याला 1 वर्षाचा सश्रम कारावास

islampur-aaropi

इस्लामपूर – माझ्यावर प्रेम कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत इस्लामपूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अमित विलास कदम ( वय २५ रा. इस्लामपूर) याला न्यायालयाने एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी.मनुघाटे यांनी ही शिक्षा सुनावली.
दि. ३ एप्रिल २०१८ रोजी अल्पवयीन मुलगी ही शाळेला जात असताना कदम याने मोटरसायकलवरून येवून तीला वाटेत अडवून व तीची ओढणी खेचली. गाडीवर बस असे म्हणत माझ्यावर प्रेम कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यानंतर तीने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी इस्लामपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याची सुनावणी सुरू होती. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, तपासी अंमलदार कोमल पोवार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी सदर आरोपीचे कृत्य हे पुर्व नियोजित व हेतूपुरस्कर असल्याने तसेच समाजामध्ये अशा प्रकारची पुन्हा कृत्ये होवू नयेत. अशा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देणेत यावी असा युक्तीवाद केला. न्यायालयाने पुराव्याआधारे कलम३५४ (ड) व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार दोषी धरत प्रत्येकी एक – एक वर्षे सश्रम कारावास व पाचशे रूपये दंड व दंड न भरलेस पाच महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावणेत आली.
सरकारी पक्षातर्फे सहा.सरकारी वकिल रणजित पाटील यांनी काम पाहिले. तपासी अंमलदार कोमल पोवार, पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे, पो.ना. संदीप शेटे यांनी सरकार पक्षास मदत केली.छेडछाड झालेल्या अल्पवयीन मुलीचे वडील फितूर झाले पण पिडीत मुलीने धाडसाने त्या तरुणाविरुद्ध साक्ष दिली.अन् छेडछाड करणाऱ्या अमित कदमला अद्दल घडवत निर्भिडपणा दाखवून दिला. या महत्वपूर्ण साक्षीमुळे कदम याला शिक्षा सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here