रत्नागिरीत थर्टी फर्स्टकरिता मोराची शिकार, वनविभागांने दोघांना घेतले ताब्यात

ratnagiri-peacoack

रत्नागिरी – बंदुकीच्या गोळीने मोराची शिकार करून त्याचे मांस शिजवून खाणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी वमविभागाने मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथे घडली.पक्षी जळालेल्या अवस्थेत असल्याने लांडोर होता की मोर हे स्पष्ट होत नाही. थर्टीफस्ट साठी मोराची शिकार दोघांना महागात पडली आहे.

हरीश्चंद्र बाबू गोताड वय 42 रा झरेवाडी याने बंदुकीने मोराची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी झरेवाडीत दाखल झाले त्यांनी हरिश्चंद्र गोताड यांच्या घरावर छापा घातला. हरिश्चंद्र गोताड आणि प्रभाकर गोताड यांच्या घरात बंदुकीच्या गोळीने मारलेल्या मोराचे मांस शिजवून आरोपींनी खाल्ले होते.

उरलेले मांस फ्रिज मध्ये ठेवण्यात आले होते.घराच्या आवारात मोरांची पिसे आणि अवयव जळालेल्या अवस्थेत दिसून आले. त्या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले असून बंदुक,मोराचे अवयव आणि मांस जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here