आजोबाच्या चाकू हल्ल्यात नातू गंभीर जखमी

knife-attack

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – आजोबा आणि वडील यांच्यात झालेल्या आर्थिक वादातून आजोबांनी 17 वर्षीय नातवाला चाकूने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 28) पहाटे गंधर्वनगरी, मोशी येथे घडली.

आशुतोष संतोष सनगर (वय 17, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे जखमी नातवाचे नाव आहे. याबाबत त्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर महादेव सनगर (वय 75, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आजोबांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष यांचे वडील संतोष आणि आरोपी आजोबा शंकर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारावरून भांडण झाले होते. त्याचा राग शंकर यांच्या मनात होता. त्यावरून सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजताच्या सुमारास शंकर याने धारदार चाकूने आशुतोष यांच्यावर हल्ला केला.त्यात आशुतोष यांच्या छातीवर, उजव्या खांद्यावर, पाठीवर, कानाला आणि डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here