उत्तरप्रदेशात संतप्त जमावाचा पोलिस स्टेशनवरच हल्लाबोल

agra-taiganj-police-station

आग्रा शहरातील घटना : पोलिसांना चोप देत पेटवून दिले पोलीस स्टेशन

आग्रा – आग्रा शहराच्या ताईगंज विभागात एका अपघातात एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने तेथील पोलिस स्टेशनवरच हल्ला करून ते पेटवून दिले. तेथील सामानाचीही जमावाने लुटालूट करून पोलिसांनाही चांगलाच चोप दिल्याची घटना काल घडली.

या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना प्रचंड पोलिस बळ येथे तैनात करावे लागले. या पोलिसांनी मग जमावाला तेथून पिटाळून लावले. ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटून एक जण मरण पावल्याची घटना घडल्यानंतर हा प्रकार घडला. जमावाने पोलिस ठाण्याच्या परिसरातील वाहनेही पेटवून दिली.

वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीतून या प्रकारात गुंतलेल्या लोकांना शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील सध्या आमची प्राथमिकता या परिसरात शांतता प्रस्थापित करणे ही आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here