वर्गात बसण्याच्या जागेवरून वाद; 10वीच्या विद्यार्थ्याने मित्रावर झाडल्या गोळ्या

bullet-fire

लखनऊ – उत्तर प्रदेशातील बुंदेलशहर जिल्ह्यात वर्गात बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने मित्रावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज भान असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी त्याला अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकरपूर शहरामधील सरस्वती इंटर काॅलेजमध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरू इयत्ता दहावीच्या दोघा विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा राग डोक्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी सुरजने शाळेत येताना दप्तरात बंदूक आणली. शाळेतील पहिले दोन तास होताच मधल्या सुट्टीत त्याने दप्तरातील बंदूक काढून भांडण झालेल्या मुलावर दोन गोळ्या झाडल्या.

गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुरजने आणलेली बंदूक ही त्याच्या काकाची असल्याचे तपासात उघड झाले आहे.सुरजचे काका हे भारतीय लष्करात कार्यरत आहेत. ते सुट्टीनिमित्त घरी आले होते. त्यांची बंदूक सुरजे शाळेत आणली होती. त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, असे बुंदेलशहरचे सीसीपी संतोष कुमार सिंघ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here