वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – आज (दि. १) २०२१ नववर्षाच्या पहाटेलाच वर्ध्यातिल बॅचलर रोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्ससमोर सकाळीच मॉर्निंगवॅाकला निघालेले रौनक सुबोध सबाने याला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचे घटनास्थळीच निधन झाले.
धडक इतकी जोरदार होती की वाहन (क्रमांक MH06 BE 4711) डिव्हॅायडरवर धडकूनन उलटले, या धडकेने रौनक मानसमंदिर रोडवर फेकल्या गेले. सदर वाहन रत्नागिरी इथल्या इसमाच्या नावावर असल्याचे कळते आहे .तसेच वाहन सचिन दीक्षित नावाचे वर्ध्यातील पोलिस कर्मचारी चालवत असल्याचे सूत्रांकडून कळले असून त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती होते हे प्रत्यक्षदर्शी कडून कळले.
रौनक हा एम एस ई बी चे निवृत्त अधिक्षक अभियंता सुबोध सबाने ,रा.रामनगर वर्धा यांचा एकलुता एक मुलगा असुन तिन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला व त्यांना २ वर्षाचा मुलगा देखील आहे. सुनसान रोडवरील झालेल्या भीषण अपघाताने वर्धेकर नववर्षाला सुन्न झाले आहे.
बेजजाबदार पणे वाहन चालवून आज एक कुटुंब उध्वस्त झाले.कालच वर्ध्याचे पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी नववर्षाच्या पूर्वसंधेला रेडिओ वर्धा ९०.८ एफ एम वरुन सूचना दिल्या होत्या. आज पोलीस विभागाच्याच कर्मचारीद्वारा बेजबाबदारपणे वाहन चालवत या मृत्यूस कारणीभूत ठरला असे अपघात स्थळावरिल लोक चर्चा करित होते.




