तात्काळ जलद सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – सद्यस्थितीत धाराशिव संचलीत वसंत दादा सहकारी साखर कारखाना जोमाने सुरू असून ,गत चार महिन्यांपासून कारखान्याचे कामकाज सुरू आहे. त्याचबरोबर लोहणेर.,विडेवाडी.,सावकी परीसरातील हजारो विद्यार्थी आँनलाइन शिक्षण घेत आहेत. विशेषतः सर्वप्रकारच्या बँकेचे व्यवहार हे आँनलाइन पद्धतीने सुरु आहेत. कारखान्यासह इतर दोन्ही तिनी खेड्यामध्ये बी एस एन एल ची सेवा उपलब्ध आहे. मात्र व.सा.का साइटवर दुरसंचार टाँवर आहे परंतु लाँकडाउन सुरू झाल्यानंतर, येथील दुरसंचार यंत्रणा पूर्णपणे बाधित झाली आहे.
गत सहा महिन्यांपासून तेथे पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध नाही, लाइट गेल्यावर संपूर्ण यंत्रणा बंद पडते. परिसरात हजारो बीएसएनएलचे कार्डधारक आहेत. व.सा.का.वर 3 G सेवा उपलब्ध असली तरी ती असून नसल्यासारखी आहे. कनेक्शन अतिशय संथ मिळते तरी यात बदलकरून 4G सेवा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी होत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, उसतोड कामगार, वाहतुक ठेकेदार, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका आदींसाठी दुरसंचार, तसेच नेट उपलब्ध व्हावे अशी मागणी दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार भारतीताई पवार यांच्यामार्फत महाप्रबंधक नाशिक यांचेकडे करण्यातआली आहे.
यासंबंधीचे निवेदन धाराशिव संचलित वसाका प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून देण्यात आले आहे. वसाकावरील दुरसंचार सेवा पुर्ण क्षमतेने व वेगाने कार्यरत व्हावी म्हणून महाप्रबंधक नितीन महाजन यांना पत्र व फोन करून विनंती करण्यात आली असल्याची माहिती वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.








