महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे उबदार शाल वाटप

nandurbar-patrkar-sangh

गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हसू; उपक्रमाचे कौतुक

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. वसंत मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर रक्तदान शिबिर व गरजूंना उबदार शालचे वाटप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे पत्रकार संघाच्या वतीने गरजूंना उबदार शालचे वाटप करण्यात आले.

सध्या कडाक्याची थंडी पडत असून रस्त्यावर, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात तसेच विविध सार्वजनिक स्थळांवर अनेक जण कापड्यांशिवाय दिसून येतात. अनेक लोक रस्त्यावर पुरेशा कापड्यांअभावी थंडीत कुडकूडताना दिसतात. यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभर उबदार वस्त्रांचे वाटप करण्यात येत आहे .या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे ही गरजूंना उबदार वस्त्रांचे वाटप नंदुरबार शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शाल मिळाल्याने गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलले.सदर उपक्रमाने समाधान व्यक्त करण्यात आले असून कौतुक करण्यात येत आहे.यावेळी धनराज माळी, राकेश कलाल, देवेंद्र बोरसे, अविनाश भामरे, देवेंद्रमाळी, जीवन माळी, ज्ञानेश्वर गवळे, प्रशांत जव्हेरी, उमेश पांढारकर, दिनेश बागुल, हाफिक मिर्झा, पंढरीनाथ पाटील, वीरेंद्र राजपूत यांच्या सह पत्रकार संघाचे विभागीय सरचिटणीस विशाल माळी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदिश सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here