नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – केबीसीमधून बोलत असून आपल्याला 25 लाखाचे बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून तरुणीची 60 हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना शहादा येथे घडली.
याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 ते 17 डिसेंबरदरम्यान कुकडेल शहादा येथील अनम जलील अन्सारी (वय 15) या मुलीच्या व्हॉटस् अॅप क्रमांकावर अज्ञात इसमाने फोन करुन मी केबीसीमधून आकाश वर्मा बोलत असल्याचे सांगून आपल्याला 25 लाख रुपयांचे बक्षिस लागल्याने आमिष दाखवले.
यासाठी संबंधीत तरुणीला 60 हजार रुपये रोख रक्कम भरण्यास सांगितले. सदर रक्कम भरल्यानंतर संबंधीत तरुणी व तिच्या मामाचे व्हॉटस् अॅप त्यांच्या परवानगीशिवाय ब्लॉक करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय सैय्यद करीत आहेत.







