नंदुरबारच्या उपनगराध्यक्षपदी रविंद्र पवार यांची बिनविरोध निवड

nandurbar-ravindra-pawar

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे रविंद्र अशोक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तीन स्विकृत नगरसेवकांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान, एका स्विकृत नगरसेवकाची तांत्रिक कारणामुळे निवड स्थगित आहे.

नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आज नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी विहित वेळेत कॉंग्रेसचे रविंद्र अशोक पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

तर स्विकृत नगरसेवकपदासाठी कॉंग्रेसतर्फे हलवाई शे. हारुण अब्दुल रशिद, योगेश संजय चौधरी व शिवसेनेतर्फे सुनिल प्रल्हाद सोनार यांनी नामांकन दाखल केले होते. तसेच भाजपातर्फे पृथ्वीराज चंपालाल जैन यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते.

चारही जागांसाठी चारच नामांकन दाखल करण्यात आल्यासने त्यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली. परंतू योगेश संजय चौधरी यांची निवड तांत्रिक कारणामुळे स्थगित ठेवण्यात आली आहे. उर्वरित सर्व स्विकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here