पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शेजारच्यांनी बाभळीच्या फांद्या पेटवून दिल्यामुळे गाईसाठी आणलेला सुक्या चाऱ्याने पेट घेतला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्हेटर्नरी डॉक्टरचा चौघांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना कळस येथे जानेवारी 2020 मध्ये घडली होती. मृत्यूचा अहवाल उशिरा आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डॉक्टर भरत दिवेकर (वय वर्षे 65, राहणार कळस, माळवाडी) असे ठार झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. राजेंद्र रामचंद्र दरेकर (वय वर्ष 48), निखिल बाळू सपकाळ (वय वर्ष 34), यतीन बाळू सपकाळ (वय वर्ष 30) सर्व राहणार कळस अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शिवाजी दरेकर (वय वर्ष 55, राहणार विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्रने फांद्या पेटल्याने शिवाजी यांनी गायीसाठी आणलेल्या सुक्या चाऱ्या पेट घेतला. त्याचा जाब विचारण्यासाठी डॉक्टर भरत तेथे गेले. त्यावेळी आरोपींनी डॉक्टर भरत यांना शिवीगाळ करून लाकडी धोपाटण्याने मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती एपीआय संदीप यादव यांनी दिली आहे आहे.







